कर्नाटक राज्यामार्फत नुकतीच १५ सप्टेंबर हा दिवस अधिकृतपणे 'अभियंता दिन (Engineers’ Day)' म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली असून अभियंत्यांना २०२६ पासून त्यांच्या नावाआधी 'Er.' (इंजिनिअर) हे व्यावसायिक संबोधन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ठळक मुद्दे:
- या घोषणेबाबतचा आदेश जारी करण्यात आला असून याद्वारे या वार्षिक कार्यक्रमाला अधिकृत मान्यता देण्यात आली आहे.
- 'अभियंता दिन' म्हणून या दिवसाला मान्यता देण्यासोबतच कर्नाटक राज्य सरकारने अभियंत्यांच्या नावाआधी 'Er.' हे संबोधन वापरण्यासही मंजुरी देत दुहेरी उद्देश साध्य केला आहे.
- एक व्यावसायिक संबोधन म्हणून 'Er.' हे अभियंत्यांना एक विशिष्ट ओळख मिळवून देण्यास मदत करते.